महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याच्या हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 1 जुलै या दिवशी वसंतराव नाईक यांची जयंती असते.1