हॉटेल रात्री दहापर्यंत खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केली. मात्र, आता पुन्हा वेळेत कपात केल्याने हॉटेल व्यवसायावर परिमाण होणार आहे. शहरातील विविध आस्थापना सुरू करण्यास परवानगी असता हॉटेल मात्र अनेक दिवस बंद होते. सुमारे दोन महिन्यांच्या निर्बंधांनंतर पुन्हा हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीवर मात करीत पुन्हा हॉटेल सुरू झाली होती. मात्र, आता वेळ कमी झाल्याने व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पालिकेच्या सुधारित आदेशानुसार, शहरातील हॉटेल सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत खुली असणार आहेत. तर रात्री अकरापर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवता येणार आहे.
#Pune #Hotel #Lockdown #coronavirus