पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरण्याची ही वेळ आहे का? - संभाजीराजे | Maratha Reservation | Sakal Media

2021-06-27 840

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरून ताकद दाखवली आहे. आता कोरोनाच्या महामारीत पुन्हा समाजाला रस्त्यावर आणायची ही वेळ आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या हातातील मागण्या मान्य करून मराठा समाजाला आधार देऊया, असा आश्वासक सूर खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे व्यक्त केला. सकल मराठा समाजातर्फे संभाजीराजे यांनी शासनाशी चर्चा करून मागण्या मान्य केल्याबद्दल भवानी मंडप येथे आज स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी मूक आंदोलनानंतर शासनासमवेत झालेली बैठक, मान्य झालेल्या मागण्या व मूक आंदोलनामागील भूमिका मांडली.
(बातमीदार - संदीप खांडेकर ) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#kolhapur #MarathaReservation #SambhajiRaje #Maharashtra

Videos similaires