कोल्हापूर - कोणत्याही परिस्थितीत राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सोमवार (२८)पासून सर्व दुकाने सकाळी नऊ ते चार दरम्यान उघडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यावेळी पोलिसांनीही सहकार्य करावे, शासनाकडून केवळ दुकानांवर बंधने घातली जात आहेत, मात्र शासन त्यांच्या नुकसान भरपाई बद्दल एक शब्दही काढत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला जात असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी आज जाहीर केले. राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्यावतीने आज सुर्या हॉल मध्ये बैठकीचे आयोजन केले होते. तीत हा निर्णय जाहीर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ललीत गांधी यांनी दिली.
बातमीदार - लुमाकांत नलवडे
व्हिडिओ - बी. डी. चेचर
#Kolhapur #LoKolhapurMarket #MarketOpenInKolhapur #RajarampuriGroup