औसा(लातूर): औशात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार पाशा पटेल, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, मुक्तेश्वर वागदरे, सुशीलकुमार वाजपेयी, संतोष मुक्ता यांच्यासह भाजपचे कार्यकत्रे व पदाधिकारी सहभागी झाले. आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. हे आरक्षण रद्द होणे हे आघाडी सरकारचे पाप असल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली. औसा शहरातील अप्रोच चौकात सुमारे तासभर रास्ता रोको करून आंदोलनकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
(व्हिडीओ जलील पठाण औसा)
#RastaRokoAndolan #AusaRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #Ausa