Nashik : पंचवटी एक्स्प्रेस तब्बल २ महिन्यांनंतर पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत सुरू
Nashik : नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी कोविड स्पेशल एक्स्प्रेस तब्बल दोन महिन्यांनंतर आजपासून पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत सुरू झाल्याने नाशिक- मुंबई प्रवाश्यांची चांगली सोय झाली आहे. आज (ता.२५) पहिलाच दिवस असल्याने तसा प्रवाश्यांचा थंड प्रतिसाद होता. आरक्षण करून या गाडीने प्रवास करता येणार आहे. कोरोना दुसऱ्या लाट व लॉकडाऊनमध्ये प्रवाश्यांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेस दोन महिन्यांपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशी आनंदित आहे.कोरोना संसर्गापासून बचाव करणारे सर्व उपाय योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
व्हिडिओ - अमोल खरे
#panchavatiexpress #covidspecialexpress ##railway #manmad #jalna #CST #nashik