मराठीतून शिक्षण घेतले म्हणून या शिक्षकांना नोकरी नाकारणे योग्य नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करत शिक्षकांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी परवानगी देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी केली. शिवसेना मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर वारंवार निवडून येते. त्यामुळे मराठी तरुणांना न्याय देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले न उचलल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कर्पे यांनी दिला.
#PratikKarpe #Shivsena #Teachers #Jobs #BJP