झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी च्या भदैनी गावात झाला. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात करत असताना 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंचे निधन झाले.‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या स्वातंत्र्य युद्धाची ती खरी स्फूर्तीदेवताच ठरली. अशा या थोर क्रांतिकारी वीरांगणेचे करावे तितके कौतुक कमीच आहेच.