अकोला, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उपवास- तपासाची वेळ नाही, कोरोना काळात देवही वाचवायला येत नाही. असे वक्तव्य एका स्थानिक वृत्तपत्रात छापून येताच वारकाऱ्यांकडून यावर तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे. अनेक वारकऱ्यांकडून आमदार जाधव यांना फोन करून आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान अकोल्यातील वारकरी प्रकाश महाराज पांडे यांनी कॉल केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये आमदार गायकवाड यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरली त्यावर आमदार गायकवाड यांनी 31 मे ला सर्व महाराजांनी सिंदखेड राजा येथे यावी मी चर्चेस तयार आहे. दरम्यान प्रकाश महाराज यांनी त्यांना 31 मे कशाला रिकामे आहोत तर आता एक दोन दिवसांतच कुठ यावे लागते आम्ही येतो असे म्हटले दरम्यान आमदार गायकवाड यांनी यावर पांडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फोन कॉल ची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावर विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी सर्व वारकऱ्यांनी एकत्र येत आमदार गायकवाड यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आवाहन केले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics