ऊर्जा विभागाच्या मानवी आणि तांत्रिक त्रुटींमुळे 12 ऑक्टोबरला मुंबई विजेविना राहिली आणि काळोखात गेली. राज्याचे उर्जा मंत्री आणि गृहमंत्री यासाठी सायबर हल्ल्याच्या सबबी पुढे करत आहेत. हा सायबर हल्ला नाही, मानवी आणि तांत्रिक त्रुटींमुळे हे घडले असल्याचे केंद्रानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्जा मंत्री आणि गृहमंत्र्यांनी सायबर हल्ल्यामुळे ही घटना घडल्याचा अहवाल कृपया विधानमंडळात मांडू नये, अशी माझी त्यांना सूचना असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येथे म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics