पोलिस विभागात १२,५३८ जागा भरायच्या आहेत, पैकी पहिल्या टप्प्यात आम्ही ५,२९७ जागा भरणार आहोत, त्या प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. शासनाचा तसा आदेशही निघालेला आहे. शुद्धीपत्रकदेखील काढलेले आहे. या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण होताच दुसऱ्या टप्प्याचीही भरती सुरू होणार आहे. ओबीसींचे शिष्टमंडळ आज भेटले होते. त्यांनाही मी सांगितले आहे की, साडेबारा हजार पोलिसांची भरती झाल्यानंतरही जर आवश्यकता वाटली तर त्यासाठी सुद्धा मंजुरी दिली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज म्हणाले.