केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आणि सहकाऱ्यांसोबत मोटारसायकलने निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा ताफा एक ते दीड हजार पोलिसांनी अडवला. त्यांना पुढे जाऊ दिले जात नाहिये आणि माघारीसुद्धा फिरू दिले जात नाहीये. त्यामुळे त्यांनी तेथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नारेबाजी सुरू केली आहे. आता काहीही होवो कृषी कायदे लागू होऊ नाही द्यायचे म्हणजे नाही. आता लढाई आर या पार ची असा पवित्रा बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी घेतला आहे.