काँग्रेस पक्षातर्फे किसान अधिकार दिवस आज देशभर राबविला जात आहे केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करावे आणि पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे देशभर आंदोलन केले जात आहे. देशातील प्रत्येक राज्यात राजभवनावर काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज उपराजधानी नागपुरात असल्यामुळे काँग्रेसने हा मोर्चा मुंबईमधून नागपूरात शिफ्ट केलेला आहे, असे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.