मुंबईतीली कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या 'मावळा' या अजस्त्र टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विकासासाठी महाआघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.