महाराष्ट्रात आणि देशात पेसा कायदा लागू केल्यानंतर आदिवासींचे आरक्षण वाढविण्यासाठी ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले होते. ते सहा टक्क्यांपर्यंत आणण्यात आले होते, पण आता मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत उपसमिती ने घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसींचे महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यातील आरक्षण 18 ते 19 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.