सांगली :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली