साताऱ्यात भाजप नेते मदन भोसले यांच्या घराबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला आज 10 दिवस पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्यांची कोणतीच दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज 10 वा घालून अनोखे आंदोलन केले
अँकर-भुईंज येथील किसनवीर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत.शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले ऊसबिल वसुली आंदोलनाला आज १० दिवस पुर्ण झाले आहेत. गेल्या १० दिवसात कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते मदन भोसले यांचे सातारा येथील घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.परंतु या आंदोलनाची कारखानदार, प्रशासन, शासन कोणीही दखल घेतली नाही.या वृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज दहाव्याचा कार्यक्रम चेअरमन यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
#Sarkarnama #SarkarnamaNews #viral #viralnews #video #news #protests