मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे भाई जगताप यांनी जाहीर केले.. कॉंग्रेससमोर आव्हानं नक्की आहेत, या आव्हानांवर मात करत येणाऱ्या काळात काँग्रेस मुंबईत वेगळं चित्र निर्माण करेल, असा विश्वासही भाई जगताप यांनी व्यक्त केला.