महाविकास आघाडी सरकारचे सल्लागार कोण आहेत, ते कळत नाही. जे कुणी आहेत, ते राज्य बुडवायला निघाले आहेत आणि सरकारलाही ते बुडवत आहेत. महाराष्ट्रात फक्त पोरखेळ चाललाय, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. भलतेसलचे निर्णय घेऊन, पोरखेळ करून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. महाराष्ट्राचे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले.