केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आज नागपूरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने केली. केंद्रीय कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे, या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे, त्यामुळं हा कायदा रद्द करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.