पुणे : शिर्डी संस्थानने महिलांच्या कपड्यांबाबत लावलेला फलक काढून घ्यावा नाहीतर आम्ही जाऊन काढू, अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली असून तृप्ती देसाई शिर्डी कडे निघाल्या आहेत. आमचा आवाज दाबला जात आहे .पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करू नये, अशी आम्ही कायदेशीर मागणी करत आहोत. आज मानवी हक्क दिन आहे. आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आम्ही शिर्डीमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत, असे तृप्ती देसाई यांनी शिर्डीला निघण्यापूर्वी सांगितले. या पार्श्वभूमीवर शिर्डीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे