आंदोलनापूर्वीच राम कदम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

2021-06-12 0

मुंबई : पालघर येथील साधू हत्याकांड प्रकरणात जनआक्रोश आंदोलनासाठी निघालेले भाजपचे आमदार राम कदम यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून ताब्यात घेतले. राम कदम आंदोलनासाठी जाणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावेळी कदम यांच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

Videos similaires