ठाणे : शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. त्यांच्या कार्यालयावरही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. प्रताप सरनाईक यांचे घर माजीवाडा मधील दोस्ती मध्ये आहे आणि ऑफिस वर्तक नगरला पाम क्लबच्या बाजूच्या इमारती मध्ये आहे.