यंदाच्या वर्षी दिवाळी साजरी करत असताना फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होत त्यापासून आरोग्याला धोका निर्माण होतो त्यामुळे घरीच आपल्या मित्र परिवाराच्या बरोबर दिवाळीचा सण साजरा करा अस आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केलं आहे. तसेच कोरोना भविष्यात देखील वाढू शकतो या साठी सोशल डिस्टन्स पाळण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
#SarkarnamaNews #news #viralnews #Sarkarnarma #MarathiNews #maharashtra