कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा आपला जीव धोक्यात घालून प्रवाश्यांची सेवा करणारा कर्मचाऱ्यांना मात्र गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत, त्याच प्रमाणे कोरोना काळात राज्यभरात सुमारे ८० एसटी कर्मचारयांना आपला जीव गमवावा लागला आहे. पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आता उदरनिर्वाह करणे देखील मुश्किल झाले आहे, त्यामुळे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपुरात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या घरासमोर बसूनच आंदोलन करण्यास सुरुवात केली. राज्यभरातील कर्मचारी अश्याप्रकारे आपल्या परिवारासह घरासमोर बसून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे साताऱ्यात एसटी काॅलनी परिसरात आज एसटी कर्मचारयांनी कुटुंबासह पगार दो आक्रोश आंदोलन केले.