सोलापूर : कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळे विकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.
"दारूड्या हा जवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, तसाच प्रकार मोदींकडून सुरू आहे. ते पंतप्रधान नसून दारूडे आहेत,' असे वादग्रस्त वक्तव्य अॅड. आंबेडकरांनी पंतप्रधानांवर टीका करताना केले.
अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी अॅड. आंबेडकर यांनी आज (ता. 20 ऑक्टोबर) केली. त्यानंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत करण्याची मागणी केली. (व्हिडिओ - विश्वभूषण लिमये)