पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू भक्कमपणे मांडावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर निदर्शने करीत आंदोलन केले. 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं' आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर निदर्शने केली.