मुंबई : सामान्य जनतेसाठी रेल्वेने प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मुंबईत रेल्वे प्रवास आंदोलन करण्यात आले. मनसेनेचे नेत संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी विनापरवानगी रेल्वेने प्रवास करून आंदोलनास सुरवात केली आहे. आज सकाळी मनसे स्टाईल गनिमीकावा करत मनसेच्या पदाधिकारीरनी थेट कर्जतवरून रेल्वेने प्रवास करत आपलं आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #AjitPawar #UddhavThackeray #MNS #SandeepDeshpande #Santosh Dhuri #RajThackeray