सातारा : मोदी सरकार हाय हाय..., शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या धिक्कार असो.., शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, कांदा निर्यात बंदीचा निषेध असो..., अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज विधान परिषदेतील पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी भवनासमोर आंदोलन केले. यावेळी महिलांनी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थाळी नाद करत निषेध नोंदविला. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे, सातारा) #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews