महाराष्ट्र पोलिस दलातील 10 पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष पोलिस पदक जाहीर झाले आहे. पदक जाहीर झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी अधिकाऱ्यांनी तपास कार्यातील त्यांचे अनुभव सांगितले. 'हा संवाद उत्साह वाढविणारा आणि चैतन्य निर्माण करणारा होता. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली आहे. त्याबद्दल सर्व सन्मानित पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन,' अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी या पोलिसांचे कौतुक केले.