मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची भूमिका सुरूवातीपासून संशयित आहे. महाराष्ट्र सरकार काही गोष्टी जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवत आहे. या प्रकरणातले सत्य बाहेर येईल, या भितीनेच बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.