गणेशभक्तांच्या भावनेशी खेळत असाल.. तर ते आम्ही चालू देणार नाही...

2021-06-12 0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमानी यांना 7 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सहीच इतिवृत्त प्रसिध्द झालं आहे. त्याबाबत आम्ही सहमत नाही. दोन्ही जिल्ह्यात 5 लाख चाकरमानी येत असतात.. मुख्यमंत्री यांच्या मार्फत आयसीएमआर गाईड लाईन्स प्रमाणे जर सात दिवसाच क्वारंटाइन करता येईल का किंवा कोरोना टेस्ट करून चाकरमानी यांना जिल्ह्यात कसं आणता येईल, असा विचार सुरू आहे जर जिल्हा प्रशासन गणेश भक्तांच्या भावनेशी खेळत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही, शासन प्रशासनाला योग्य निर्णय देईल, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.
#sarkarnama #Bulletin #Maharastra सरकारनामा मॅानिंग बुलेटिन | राजकीय घडामोडी | महाराष्ट्र | पॅालिटिक्स | राजकारण

Videos similaires