माझ्या सूचनेचा समाजकंटकांकडून विपर्यास : पृथ्वीराज चव्हाण

2021-06-12 0

कऱ्हाड : कोरोना विषाणूमुळे उद्‌भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे. त्या बदल्यात संबंधित संस्थांना एक किंवा दोन टक्के व्याज द्यावे, अशी सूचना केली होती. मात्र त्याचा काही समाजकंटकांनी व विशिष्ट माध्यमांनी विपर्यास केला. त्यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट धर्माला केंद्रबिंदू मानून विधान केल्याचे भासविले गेले. त्या संदर्भात योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Videos similaires