बीड जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा येथील पवार गल्लीत काही नागरिक रस्त्यावर उभे होते. यावेळी पोलीस तिथे पोहचले आणि नागरिकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी थेट लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिक संतापले आणि नागरिकांनी देखील पोलिसांवर हल्ला चढविला. पोलीस आणि नागरिक यांच्यात तब्बल दहा मिनिटे फ्री स्टाईल हाणामारी झाली यात पवार गल्ली येथील अनेक महिला पुरुष नागरिक जखमी झाले आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या सिरसाळा परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे.