अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी त्यांच्या अमरावती येथील निवासस्थानी मतदार संघातील बंजारा पाड्यावरील महिलांसोबत डफळीच्या तालावर बंजारा नृत्य करत एकमेकांना गुलाल लावून होळीचा उत्सव साजरा केला. यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात भरपूर बंजारा पाडे असून त्या दरवर्षी याचप्रमाणे होळी साजरी करतात