आमदार भारत भालके यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी विठ्ठल इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगारांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले केले.
आमदार भारत भालके हे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याकडे सुमारे 5 कोटी 79 लाखांची एफआरपी थकीत असून कामगारांचे 11 महिन्याचे वेतन थकले आहे. थकीत एफआरपी आणि कामगारांचे वेतन द्यावे; अन्यथा भालकेंनी कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्या या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकरी आणि कामगारांनी एक दिवसाचे उपोषण सुरू केले आहे. (व्हिडिओ : भारत नागणे, पंढरपूर) #Pandharpur #Bharat Bhalke #Solapur