अकोला : नारायण राणे यांची उपयुक्तता ही केवळ शिवसेनेवर टिका करण्यापुरतीच आहे. त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांचा तपास हा केंद्रीय संस्थांच्याकडे जाऊ नये, म्हणून ते भाजपसमोर नाक घासत असल्याचे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. स्वतःच खाली केलेली आमदारकीची जागा सुद्धा ज्या पक्षाबरोबर आपण जातोय, त्यांनी त्यांना दिली नाही. मात्र कोणाचे नाक कापले गेले याची जाणीव सुद्धा त्यांना नसल्याचा टोला शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लगावला.