कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित पक्षाच्या मासिक बैठकीला काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशाच्या पाश्वर्भूमीवर मोठे शक्तीप्रदर्शन झाले. या बैठकीत जिल्हा काँग्रेसमधील शंभर टक्के पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचा दावा राणे यांनी यावेळी केला. दरम्यान, आज नांदेड येथे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होती. मात्र, राणे या सभेला अनुपस्थित होते. 'राहुल गांधी यांना आवडले नसते म्हणूनच नाही गेलो' असा खुलासा राणे यांनी आपल्या अनुपस्थितीबद्दल केला आहे.