शेतकरी संपाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर राज्य सरकारने दोन दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास 'आम्ही दोन दिवस असेच पाण्यात उभे राहू, नंतर अन्नत्याग करू, प्रसंगी जलसमाधी घेऊ', असे सांगत शिंदखेडा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारपासून साहूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) गावालगत तापी नदीपात्रात जलआंदोलन सुरू केले. ते अद्याप सुरूच आहे.