विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात केळीच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून त्यांना राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सिरियस नसल्याचं म्हणत पीक विम्याच्या विषयावरून सरकारला धारेवर धरलं आहे.