संजय राऊत यांनी मराठा आंदोलनाच्या विषयावर महाराष्ट्र सरकार संभाजीराजे यांच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. ते सर्व नेत्यांना भेटले आहेत परंतु सर्वात प्रमुख भेट ही नरेंद्र मोदींची असली पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये हुकुमाचे पान आहेत त्यांनी ते पान टाकावं असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसंचआम्ही सगळे छत्रपती संभाजीराजे यांच्या मतांशी सहमत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.