राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भूतं असली तर त्यांच्या आसपास असावीत असा टोला संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. फाईलीवर आठ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसं नाही अशी टीकाही त्यांनी केली.
#SanjayRaut #Shivsena #Maharashtra