इन्फ्लूएन्झाची लस दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखता येईल. त्याचसोबत रुग्णालयावरील ताण सुद्धा कमी होईल असे ही त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व लहान मुलांना इन्फ्लूएन्झाची लस द्यावी असा सल्ला कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.