मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्य सरकारवर या मुद्द्यावरून टीका केली जात आहे. विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधला जात असताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.