नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्या अशी मागणी भाजपानी केली आहे.शेतकऱ्यांनी लाखोंचा पीक विमा भरला आहे. मात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळाला नाही. तांत्रिक अडचणी दाखवून विमा भरपाई नाकारली जातेय. त्यामुळे विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचं साटेलोटे असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.