जालना पोलिसांनी एका प्रकरणात १७ आरोपींना अटक केली होती. ईद असल्याने आरोपींनी नमाज अदा करण्यासाठी विनंती केल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी पुढाकार घेऊन थेट पोलीस ठाण्यातच त्यांना नमाज पठण करण्याची परवानगी दिली. इतकंच नाही नमाज अदा केल्यानंतर आरोपींसाठी पोलिसांनी जेवण्याची देखील व्यवस्था केली होती. या आरोपींना ईद साजरी करु दिल्याबद्दल मुस्लिम धर्मगुरुंनी पोलिसांचे आभार मानले आहेत.