मोहाडी पोलिसांनी केली कारवाई

2021-05-14 374

राज्यामध्ये गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक सुरूच आहे. इंदोरहून धुळे मार्गे पुण्याकडे जाणारा 9 लाख किमतीचा गुटखा मोहाडी पोलिसांच्या जागृकतेमुळे पकडला गेला. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली.मिळालेल्या महितीनुसार सापळा रचून मोहाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.