देशभरासह राज्यात सध्या करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपासून सर्वसामान्य माणसाची आर्थिक गणितं बघिडल्याचे दिसत आहे. वर्षभरापासून व्यवसाय ठप्प असल्याने अनेक व्यावसायिकांनी जमेल ते काम करण सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध बॅण्ड व्यावसायिकांने देखील आपल्या दुकानात आता भाजपीला व अन्य किराणा सामान विक्री सुरू केली आहे.