विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. एका बाजूला सरकार करोनामुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचा दावा करतंय आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन वाढवण्याचं निर्णय घेतला जातोय. हा सरकारच्या भूमिकेतील विरोधाभास असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. पाहुयात प्रविण दरेकर लॉकडाऊन वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावर नेमकं काय म्हणाले.