पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार

2021-05-12 2,067

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी तान्हाजी पवार याला अटक करण्यात आली असून, आमदार बनसोडे यांनी स्वतः झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली.